ताज्या घडामोडी

हुंबरळी” या पूरग्रस्त गावातील शैक्षणिक इमारतीचे लोकार्पण संपन्न!

शैक्षणिक इमारतीचा लोकार्पण सोहळा भारत सरकारच्या विमुक्त जनजाती विकास बोर्डाचे माजी अध्यक्ष ,ज्येष्ठ विचारवंत दादा इदाते यांच्या शुभहस्ते संपन्न.

Spread the love

हुंबरळी” या पूरग्रस्त गावातील शैक्षणिक इमारतीचे लोकार्पण संपन्न.

गतवर्षी झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे भूस्खलन झालेल्या पाटण तालुक्यातील कोयनानगर परिसरातील हुंबरळी या गावातील शालेय विद्यार्थ्यांसाठी पुण्यातील सुप्रसिद्ध नोबल हॉस्पिटल च्या वतीने आणि भोई प्रतिष्ठानच्या समन्वयाने बांधण्यात आलेल्या शैक्षणिक इमारतीचा लोकार्पण सोहळा भारत सरकारच्या विमुक्त जनजाती विकास बोर्डाचे माजी अध्यक्ष ,ज्येष्ठ विचारवंत दादा इदाते यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या अनोख्या भेटीमुळे येथील ग्रामस्थ, विशेषत शालेय विद्यार्थी यांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. याप्रसंगी  दादा इदाते यांनी बोलताना समाजाच्या दुर्लक्षित आपत्तीग्रस्त बांधवांचे अश्रू पुसण्यासाठी नोबेल हॉस्पिटल पुणे व भोई प्रतिष्ठान पुणे यांनी केलेल्या या अनोख्या उपक्रमाबद्दल कौतुक करून अशा प्रकारचे उपक्रम व्यापक स्वरूपात राबवण्यात यावेत त्यासाठी आम्ही सदैव पाठीशी राहू असे अभिवचन दिले. पुण्यातील सुप्रसिद्ध नोबल हॉस्पिटल चे संचालक विख्यात नेत्ररोग तज्ञ डॉ.मंगेश लिंगायत यांनी याप्रसंगी बोलताना या परिसरातील इतर आपत्तीग्रस्त गावांमध्ये सुद्धा अशा प्रकारची शैक्षणिक स्वरूपाची मदत देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहून या परिसराचे शाळांसाठी संगणक देण्याचे आश्वासन दिले .

कार्यक्रमाचे संयोजक, भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष व भारत सरकारचे राष्ट्रीय युवा पुरस्कार समानार्थी डॉ.मिलिंद भोई यांनी कार्यक्रमाचे आयोजनामागची भूमिका स्पष्ट करताना या परिसरातील या पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक पालकत्व योजना राबवण्यात येणार असल्याचे सांगून याप्रसंगी या पंचक्रोशीतील सहा अनाथ मुलांचे शैक्षणिक पालकत्व भोई प्रतिष्ठानने स्वीकारले आहे असे सांगून या परिसरातील दरड कोसळून उद्ध्वस्त झालेल्या आंबेघर या गावात सुद्धा अशा प्रकारचा प्रकारचा प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
याप्रसंगी जगप्रसिद्ध आयुर्वेद तज्ञ डॉ. चंद्रकांत पवार ,भोई प्रतिष्ठानचे समन्वयक जयशंकर माने, महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व खात्याचे अधिकारी   हेमंत गोसावी, सामाजिक कार्यकर्ते अशोक देसाई नरेश देसाई, टी.एल. देसाई अर्जुन देसाई, विश्‍वनाथ कदम, करण गुरव, सामाजिक कार्यकर्ते विनोद जोशी, अशोक दुरगुडे,क्रूष्णा पवारआदि मान्यवर उपस्थित होते.
हुंबरळी गावचे सरपंच रेश्मा कांबळे, उपसरपंच  दिपाली कोकरे,जयवंत शेलार, या प्रकल्पाचे समन्वयक  रमेश देसाई,  दिनेश देसाई यांनी या उपक्रमाचे आयोजन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!