पंढरपूरात लाखो वारकरी पांङुरंगाच्या दर्शनासाठी दाखल होणार.

देशातील लाखो वारकरी भाविकांचे दैवत असणाऱ्या श्रीगुरु पांडुरंगाच्या दर्शनासाठी अलंकापुरीत दाखल होणाऱ्या वैष्णवांच्या मेळ्यासाठी शहरातील मूलभूत सोयी – सुविधा अनुषंगाने निर्माण होणाऱ्या समस्या व अडचणी संदर्भात पुणे विभागीय आयुक्त मा. डॉ. सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली व पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. समाधान आवताडे यांच्या उपस्थितीमध्ये पंढरपूर येथे आढावा व विचारविनिमय बैठक पार पडली.
वारकरी भाविकांची मांदियाळी असणाऱ्या आषाढी एकादशीनिमित्त अवघ्या वारकरी संप्रदायाला वारी सोहळ्यासाठी पंढरीची ओढ लागलेली असते. हरीभक्तीच्या छंदात दंग होऊन विठुनामाचा जयघोष करत लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल होतात. भक्ती साधनेचे माहेरघर असणाऱ्या पंढरपूर शहरातील विविध समस्या अथवा प्रश्न शासनसहाय्य माध्यमातून आषाढी वारीपूर्वीच सुटावेत यासाठी आ. समाधान दादा आवताडे हे अनेक दिवसांपासून आग्रही आहेत. आ. समाधान आवताडे यांनी भाविकांच्या आरोग्य दृष्टीने औषध – गोळ्या यांचा मुबलक साठा उपलब्ध करून देणे, स्वच्छतेच्या अनुषंगाने सार्वजनिक शौचालय यांचे प्रमाण वाढविणे, येणाऱ्या वारकरी भाविकांना पिण्यासाठी स्वच्छ आणि शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पाणी शुद्धीकरण प्लांटमध्ये वाढ करणे आदी प्रश्नांवर पुणे येथे झालेल्या बैठकीत शासनाचे लक्ष वेधून घेतले होते. आ. समाधान आवताडे यांनी केलेल्या सदर मागण्यांच्या संदर्भात आढावा घेणारी ही बैठक पार पडली.
या बैठकीसाठी जिल्हाधिकारी मा. डॉ. मिलिंद शंभरकर, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव आणि RDC शमा पवार सोलापूर ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव प्रांताधिकारी मा. गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी मा. विक्रम कदम, पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील धनंजय जाधव पवार आदी मान्यवर, विविध खात्यांचे प्रशासकीय अधिकारी, मंदिर समितीचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.



