ताज्या घडामोडी

मावळ: इंदोरी येथे इंद्रायणी नदीत कार  कोसळून एकाचा मृत्यू.

चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार नदीच्या पुलावरून पाण्यात पडली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Spread the love

मावळ: इंदोरी येथे इंद्रायणी नदीत कार  कोसळून एकाचा मृत्यू.
तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंदोरी येथे इंद्रायणी नदीपात्रात एक कार पडली. ही घटना शुक्रवारी  मध्यरात्री घडली आहे. कार मधील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही.

तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्री एक कार तळेगाव-चाकण रोडने जात होती. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार नदीच्या पुलावरून पाण्यात पडली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. यात कारमधील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!