व्ही. पी.एस समोरच्या रेल्वेच्या पादचारी पूलावर फरशी निघून खड्डेच खड्डे ; दुरूस्तीची मागणी..
व्ही.पी.एस समोरच्या रेल्वेच्या पादचारी पूलावर फरशी निघून खड्डेच खड्डे ; दुरूस्तीची मागणी..
लोणावळा ता.२०(प्रतिनिधी ) व्हीपीएस हायस्कूल समोर रेल्वेच्या पादचारी पुलावर फशी निघून खड्डेच खड्डे पडले आहेत. निकृष्ट काम केल्यामुळे येथून शालेय विद्यार्थांना रोज जा ये करताना अडथळ निर्माण होऊ शकतो ,तसेच अपघाताचीही शक्यता असल्याने येथे तात्काळ रेल्वेकडून दुरूस्तीची गरज पालकांनी व्यक्त केली आहे. याबाबत जेष्ट सामाजिक कार्यकर्ते व लोणावळ्याचे माजी उपनगराध्यक्ष डाॕ.धिरूभाई टेलर कल्याणजी यांनी लक्ष वेधले असून सुमारे तीन ते चार हजार विद्यार्थी , शे दीडशे शिक्षक शिक्षिका तसेच पर्यटक यांना रेल्वे क्राॕसिंग करावे लागू नये म्हणून हा पादचारी पूल बांधलेला आहे. या ठिकाणी फरशी कमी दर्जाचे सिमेंट वापरल्यामुळे निघत आहे. गुळगुळीत फरशी पावसाळ्यात धोकादायक असून खड्डेमुक्त पूल करावा व चांगली फरशी बसवावी अशी मागणी होत आहे. .



