आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*मागासवर्गीय नवउद्योजकांच्या स्टार्टअपला शासनाच्या वतीने रेडकार्पेट!सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया चे नागपूर सेंटर उद्घाटन संपन्न* ,

*महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, मुंबई व सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया, नागपूर यांचा मध्ये महत्वपूर्ण सामंजस्य करार, अनुसूचित जातीच्या युवक-युवतींसाठी ५० जागा राखीव* .

Spread the love

मुंबई:-  (सखाराम कुलकर्णी) राज्यातील अनुसूचित जाती घटकांतील युवक-युवती तसेच नव उद्योजकांसाठी महत्त्वाचा निर्णय शासनाच्या महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाने घेतला आहे. दि १०/०२/२०२४ रोजी नागपूर येथे सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडियाच्या सेंटरचे उद्घाटन संपन्न झाले आहे. सदर उद्घाटन प्रसंगी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित,(MPBCDC) आणि सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया (STPI) च्या नागपूर सेंटर यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MOU) झाला आहे. सदर करारानुसार (MOU) येथील नागपूर सेंटर मधील ५० जागा ह्या अनुसूचित जातीचा युवक युवतीसाठी राखीव ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे, त्यामुळे मागासवर्गीय समाजातील नव उद्योजकांना महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, च्या वतीने रेडकार्पेट उपलब्ध झाले आहे. राज्यात प्रथमच सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी क्षेत्रात शासन स्तरावरुन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, च्या माध्यमातून पाउल पडले आहे.

भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक व सूचना प्रायोगिक मंत्रालयाच्या अधिनस्त असलेले सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया (STPI) यांचे नागपूर येथे सेंटर सुरू करण्यात आले आहे. सदर सेंटरचे उद्घाटन आज रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.यावेळी इलेक्ट्रॉनिकी व सुचना प्रोद्योगिकी मंत्रालय, भारत सरकार चे सहसचिव श्री संकेत भोंडवे, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, मुंबई अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक,डॉ. अमोल शिंदे, सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया पुण्याचे संचालक, डॉ.संजयकुमार गुप्ता, सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिय पुण्याचे महासंचालक, श्री अरविंद कुमार, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, मुंबई चे महाव्यवस्थापक श्री प्रशांत गेडाम, व श्री जितेंद्र देवकात आदि मान्यवर उपस्थितीत होते.
नव उद्योजकीय स्टार्ट-अपला पाठिंबा देण्यासाठी आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी अनुसूचित जातीतील ५ युवक-युवतींना महात्मा फुले महामंडळाच्या पीएम-अजय योजनेंतर्गत प्रत्येकी ५० हजार रुपये प्रमाणे एकूण २ लाख ५० हजार रूपयांचे अर्थसहाय्य यावेळी श्री.नितीन गडकरी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. श्री.नितीन गडकरी यांनी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, मुंबई च्या या उपक्रमाचे स्वागत केले आहे. नव उद्योजक घडण्यास मदत होणार यातून हजारो युवकांना प्रेरणा व रोजगार उपलब्ध होईल असा आशावाद श्री गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, डॉ. अमोल शिंदे, यांनी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली व सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्री सुमंत भांगे यांच्या मार्गदशनाखाली महात्मा फुले महामंडळाने महत्वाचे निर्णय घेतले असून त्यातून मागासवर्गीय समाजाचा सर्वांगीण विकास होण्यास हातभार लागणार आहे. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ हे हॅपीनेस इंडेक्सवर काम करीत आहे. तसेच सदर महामंडळामार्फत उद्योग रोजगार मित्र हे कार्यक्रम राबविण्यात येत आहे , राज्यात जिल्हा पातळीवर येणा-या काळात “ महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, मुंबई व महाप्रित” च्या माध्यामातून व्यापक उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच स्टार्टअप च्या माध्यमातून तरुणांच्या संकल्पनांना पाठबळ देऊन त्यांना आर्थिक सहाय्य देऊन, त्यांचा उद्योग व्यवसाय वाढीसाठी महामंडळ कटीबद्ध असल्याचे श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!