ताज्या घडामोडी

कुसगाव बुद्रूक विकास सोसायटी निवडणूक बिनविरोध.

कुसगाव बुद्रूक विकास सोसायटी चेअरमनपदी मधुकर कडू ;तर उपसरपंच पदी एकनाथ गुंड ..

Spread the love

कुसगाव बुद्रुक विकास सोसायटी चेअरमनपदी मधुकर कडू ; व्हाईस चेअरमन पदी एकनाथ गुंड यांची बिनविरोध निवड…
लोणावळा ता.कुसगाव  बुद्रूक , कुरवंडे, डोंगरगांव येथील कुसगाव बुद्रुक विविध कार्यकारी सहकारी सोसायटी च्या चेअरमनपदी उद्योजक मधूकर किसन कडू ;तर व्हाईसचेअरमन पदी एकनाथ तुकाराम गुंड पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. वडगाव येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात ही विशेष सभा झाली. या बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे मान्यवरांचे तर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
या निवडणुकीत विनोद कोतकर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली. या निवडीनंतर माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ताभाऊ शंकरराव गुंड, तंटामुक्ती अध्यक्ष शंकरराव गाडे, शिवसेना उपतालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, डोंगरगांवचे माजी उपसरपंच संजय जायगुडे, माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक महादू जायगुडे, माजी चेअरमन बाळासाहेब गुंड, बाळासाहेब नाणेकर, उद्योजक ज्ञानेश्वर गुंड, उपसरपंच सुरज केदारी , सरपंच सुनील येवले, माजी सरपंच अशोक ठुले, कुसगाव बुद्रूक चे सदस्य राजेश काटकर, संजय गुंड, कुरवंडेचे माजी सरपंच सखाराम कडू यांचेतर्फे नवनिर्वाचित चेअरमन , व्हाईस चेअरमन यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी संचालक विलास कचरे पाटील, प्रकाश गुंड, सुभाष कचरे, बाबू वाल्हेकर, गणेश गाडे, नवनाथ गाडे, सुनिल बंडू गुंड, किसन महादू गुंड पाटील,लहू गुंड पाटील, मावळ तालुका दिंडी समाज खजिनदार अशोक राऊत, मा.सदस्य अविनाश गुंड, चंद्रकांत सदाशिव गुंड पाटील, मदन गाडे, मा.उपसरपंच विद्यमान संचालक दिनेश जायगुडे, शंकर पांडुरंग गुंड, नाना मराठे, सखाराम वाजे, हनुमंत साबळे , नंदकुमार गाडे, अशोक कारके, काशिनाथ गाडे, सदस्य भरत मोरे , मोहन कडू यांनी बिनविरोध निवडणूक करीता परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!