ताज्या घडामोडी

पावनखिंडचे निर्माते अजय आणि अनिरुद्ध आरेकर यांना नूतन महाराष्ट्रचा टिळक – विजापूरकर पुरस्कार

Spread the love
  1. पावनखिंडचे निर्माते  अजय आणि  अनिरुद्ध आरेकर यांना नूतन महाराष्ट्रचा टिळक – विजापूरकर पुरस्कार

तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे, नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी यांचे वतीने विहंगम-२०२२ मध्ये पावनखिंडचे निर्माते   अजय आणि अनिरुद्ध आरेकर यांना संस्थेचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांचे हस्ते टिळक – विजापूरकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यावेळी संस्थेचे सचिव संतोष खांडगे, खजिनदार राजेश म्हस्के, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, जेष्ठ संचालक चंद्रकांत शेटे, यादवेंद्र खळदे, महेशभाई शहा, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, प्राचार्य डॉ. ललितकुमार वधवा, पावनखिंडचे कलाकार गणेश टाव्हरे आदी उपस्थित होते.

शिवमय वातावरणात पावनखिंड या ऐतिहासिक चित्रपटाला पहिला पुरस्कार मिळाल्याने अतिशय आनंद होत आहे असे श्री. अनिरुद्ध आरेकर यांनी पुरस्काराला उत्तर देताना सांगितले.
पावनखिंड मध्ये पन्हाळ्याचा किल्लेदारची भूमिका केलेले अभिनेते गणेश टाव्हरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास विद्यार्थ्यांच्या मनात खोलवर रुजला पाहिजे आणि अखंड तेवत ठेवला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.

पावनखिंडीत लढाईचे चित्रीकरण चालू असताना सिद्धी मसूरची भूमिका करणारे अस्ताद काळे यांना बाजीप्रभूंची भूमिका करणारे अजय पुरकर यांच्यावर हत्यार उचलण्याची हिम्मत झाली नाही अश्या अनेक पावनखिंड चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळच्या अंगावर शहारे देणाऱ्या आठवणी सांगितल्या.
गेले आठ दिवस कला, क्रीडा, शैक्षणिक आणि सांस्कृतिक यांचा मेळ असलेल्या विहंगम – २०२२ या कार्यक्रमाची सुरुवात रंगमंच पूजनाने माजी राज्यमंत्री श्री. बाळा भेगडे यांच्या हस्ते झाली.

विहंगम २०२२ चे नियोजन सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी प्रतिनिधींनी केले.

यावेळी विद्यार्थ्यांनी साकारलेली शिवगर्जना, शंभूगर्जना, गीत, नृत्ये, वादक वादन, नाटके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन आकांक्षा, ऋतुजा, इशिका, अतुल्य, प्रयुक्ती, सच्चीतानंद, पार्थ, मानसी यांनी तर आभार दिशान यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!