ताज्या घडामोडी

शैक्षणिक क्षेत्रात शिक्षकांचे शिकवण आणि सामाजिक ज्ञान हे विद्यार्थ्यांनी आत्मसात केल्यास भवितव्य घडते.

Spread the love

पिंपरी चिंचवडः आई-वडिलांप्रमाणेच शिक्षकही मुलांना घडवित असतात. शैक्षणिक क्षेत्रात शिक्षकांचे शिकवण आणि सामाजिक ज्ञान हे विद्यार्थ्यांनी आत्मसात केल्यास भवितव्य घडते. संगणक युगामध्ये संगणक शिक्षण अत्यंत महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांना तारणारे आहे असे मत ज्येष्ठ विचारवंत व अभ्यासक शरद इनामदार यांनी व्यक्त केले.
सुपरटेक कंप्यूटर एज्युकेशनच्या वतीने महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता मुसळे यांनी केले. शैक्षणिक तक्रार निवारण अधिकारी विलास पाटील, मुख्याध्यापिका जयश्री निंबाळकर ऍड दिलीप निंबाळकर प्रभात पिंपरी विभागाचे संपादक सुहास भाकरे सुपरटेक कॅम्पुटर एज्युकेशनचे बी.के चौधरी विद्यार्थी एज्युकेशनचे शिक्षक आदी यावेळी उपस्थित होते.
दिप प्रज्वलनाने स्नेहमेळावा कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. सध्याचे युग हे संगणक युग बनले आहे. लहान मुलांच्या हि हातात मोबाईल आले आहे. कोरोना संकटाने ऑनलाईन शिक्षण प्रणाली सर्वाना शिकवले. संगणक शिक्षणा शिवाय पर्याय नाही.आयटी क्षेत्रात संगणक शिक्षण घेणाऱ्यालाच महत्व आहे. आयटी क्षेत्रात विद्यार्थ्यांना शिक्षक नोकरीची संधी मिळवून देण्याची ग्वाही एज्युकेशनचे चौधरी यांनी प्रास्ताविक भाषण यांनी केले. विद्यार्थ्यांनी कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनावर वक्तव्य केले. पिंपरी विभाग प्रभातचे उपसंपादक भाकरे सुहास यांनी आभार मानले .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय साळुंके, सुशीला चौधरी, अलिम शेख, सुभाष खरटमोल, निजाम शेख, योगेश गोखले, जाफर शेख, सुयश ढगे, मराठवाडा युवा मंचचे अध्यक्ष सत्यजित चौधरी, चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, राम अग्रवाल यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!