ताज्या घडामोडी

कल्हाट पवळेवाडी ग्रामपंचायत उपसरपंचपदी कविता पवार

Spread the love

मावळ : तालुक्यातील कल्हाट पवळेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कविता पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपसरपंच प्रमिला आगिवले यांनी मुदत संपल्याने पदाचा राजीनामा दिला. रिक्त झालेल्या पदासाठी कविता पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी सरपंच बिजाबाई जाचक यांनी पवार यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.‍

यावेळी भाजपा आंदर मावळ अध्यक्ष गणेश कल्हाटकर, माजी चेअरमन नथू करवंदे, माजी ग्रामपंचायत सदस्य नंदू करवंदे,बबन आगिवले, भाऊ धनवे माजी, उपसरपंच जावेद मुलानी, माजी उपसरपंच रूपाली करवंदे, सदस्य बुधाजी जोगेश्वर, ग्रामसेवक शशिकिरण जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!