ताज्या घडामोडी

अपंग बांधकाम मजुरास मारहाण, गुन्हा दाखल

Spread the love

तळेगाव: येथील ढालेशवर निषाद (वय 32 वर्ष) या बांधकामांवर काम करणा-या मजूरास एकाने मारहाण केली आहे. हा बांधकाम कामगार तळेगाव परिसरामध्ये दैनंदिन रोजंदारीवर मिळेल ती कामे करून आपली उपजीविका भागवत आहे. सदर मजूर हा शारीरिक दृष्ट्या अपंग असून देखील परिस्तितीशी संघर्ष करत जमेल ते काम करून जीवन कंठत आहे.

दि. 2 एप्रिल रोजी नेहमी प्रमाणे काम शोधत असताना एका मुकादमाने सदरील मजुरास तळेगाव दाभाडे येथील ज्ञानेश्वरनगरी येथे घेऊन आला व तेथील एका बांधकामावरती काम करण्यास सांगितले.त्यानुसार ढालेशवर हा टेरेस वर आपले काम करत असताना तेथील बिल्डिंग मध्ये राहणारा आरोपी नामे योगेश सुरेश राठोड (वय 35 वर्ष राहणार ज्ञानेशवर नगरी तळेगाव) हा तेथे आला व तू येथे कोणाला विचारून काम करत आहेस असे म्हणून घाण घाण शिवीगाळ करत अंगावर धावून आला धक्का बुक्की करू लागला व तेथील अल्युमिनिअम बॉटम पट्टी घेऊन ढालेशवर यास मारहाण करून जखमी केले.

मजूर निषाद काम करत असलेल्या घराच्या घरमालकांची नावे स्वप्निल भालेराव व महेंद्र भालेराव अशी असून या भिंतीच्या बांधकामावरून भालेराव यांचे योगेश राठोड यांच्याशी वाद सुरू आहेत. या भिंतीचे प्लास्टर काम करण्यासाठी ढालेशवर निषाद गेला असता राठोड याने त्याला मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

योगेश राठोड यांच्याविरोधात भा. द. वि 324 , 504 व 506 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अधिक तपास पो. हे. कॉ. किसन कोलप हे करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!