ताज्या घडामोडी

इंधन दरवाढ सुरूच ! सलग सातव्या दिवशी पेट्रोल व डिझेल महागले

Spread the love

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा सपाटा सुरूच असून सलग सातव्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. पेट्रोल 80 पैसे तर डिझेल 70 पैसे प्रति लिटर महागले आहे. एका आठवड्यात किमतीत 4 रुपयांची वाढ झाली आहे.

प्रमुख शहरातील पेट्रोलचे दर पुढीलप्रमाणे

मुंबई पेट्रोल 115.04 रुपये प्रतिलिटर झाले आहे. दिल्लीत पेट्रोल शतक झळकावत असून आता लिटरमागे 100.21 रुपये मोजावे लागणार आहे. कोलकत्यात 109.68 रुपये तर चेन्नईत पेट्रोलचा भाव 105.94 रुपये झाला आहे. पेट्रोलियम कंपन्या पेट्रोल डिझेलच्या दरात आणखी 9 ते 12 रुपयांची वाढ करण्याची शक्यता असल्याने येथे येत्या काही दिवसात महागाईचा पुन्हा भडका उडू शकतो.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!