ताज्या घडामोडी

महागाई विरोधात काँग्रेस करणार आंदोलन

नाना पटोले यांची घोषणा

Spread the love

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या दरावर होत आहे.गेल्या काही दिवसात महागाईचा भडका उडाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. या सर्व परिस्थितीला केंद्र सरकार जबाबदार असल्याचे सांगत महागाईच्या विरोधात येत्या 31 मार्च पासून काँग्रेस आंदोलन करणार आहे अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

गरज सरो वैद्य मरो या वृत्तीचे केंद्रातील भाजप सरकार निवडणुका संपताच महागाई भडकवते.या सरकारच्या निषेधार्थ काँग्रेस पक्ष 31 मार्च पासून 7 दिवस महागाईच्या विरोधात आंदोलन छेडणार आहे असे पटोले म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!