ताज्या घडामोडी

तळेगावात 24 ते 26 मार्च रोजी रंगणार स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला

Spread the love

तळेगाव : शहरात श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ व समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठान तसेच रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे आयोजन 24 ते 26 मार्च रोजी करण्यात आले आहे.

स्वामी विवेकानंद स्कूलच्या मावळ भूषण मामासाहेब खांडगे सभागृहात सायंकाळी साडेचार वाजता आयोजित व्याख्यानात 24 मार्च रोजी पहिले पुष्प शिवपूर्वकालीन भारत आणि आक्रमकांच्या लढायांचा इतिहास या विषयावर प्रसिद्ध वक्ते इतिहास संशोधक प्राध्यापक डॉ. लहू गायकवाड गुंफतील.

दिनांक 25 मार्च रोजी दुसरे पुष्प प्राध्यापक डॉ. प्रमोद बोराडे यांचे शिवकाळ ते भारताच्या स्वातंत्र्य काळापर्यंतच्या लढायांचा इतिहास या विषयावर होईल. दिनांक 26 मार्च रोजी स्वातंत्र्य उत्तर भारत ते रशियन युक्रेन युद्ध पार्श्वभूमी या विषयावर सुप्रसिद्ध वक्ते ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचे व्याख्यान होईल.

या व्याख्यानमालेला शहरातील व परिसरातील रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!