आपला जिल्हामहाराष्ट्र
आपल्या मातीचे भूषण अंबाजोगाई दर्शन न्यूज चैनल चा 24 वा वर्धापन दिन अंबाजोगाई येथे पत्रकार भवनात संपन्न झाला
दिनांक 29 9 2024 रविवारी पत्रकार कक्षात अनेक आजी माझी भावी आमदार व विविध पक्षाचे नेते सामाजिक कार्यकर्ते पत्रकारांच्या उपस्थितीत अंबाजोगाई दर्शन न्यूज चैनल चे संपादक श्री सतीश मोरे यांच्यावर शुभेच्छा चा वर्षाव करण्यात आला तर उपस्थित भावी आमदाराने येणाऱ्या विधानसभा निवडणुकी संदर्भात 2024 चे विजन सविस्तर पद्धतीने मांडले अंबाजोगाई दर्शन न्युज चैनल च्या वर्धापन दिनानिमित्त आदर्श मैत्री फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य व मराठवाडा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तालुका अंबाजोगाई यांच्या सौजन्याने घेण्यात आलेल्या गौरी महालक्ष्मी आरास देखावा व पारंपारिक उखाणा स्पर्धेचे बक्षीस वितरण हे याप्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण करण्यात आले अंबाजोगाई दर्शन न्यूज चैनल च्या 24 व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या सोहळ्याचे अध्यक्ष सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक श्री नारायणराव मोरे हे होते तर या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून केज व परळी विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदारश्री पृथ्वीराज साठे,काँग्रेस पक्षाचे बीड जिल्हा अध्यक्ष व परळी विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार श्री राजसाहेब देशमुख, सेवानिवृत्त इंजिनियर श्री एन डी शिंदे,डॉक्टर अंजलीताई घाडगे,ज्येष्ठ पत्रकार व उमेदवार श्री वैभव स्वामी ,ओबीसी नेते प्राध्यापक टी पी मुंडे,डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेश अध्यक्ष अनिल वाघमारे,एडवोकेट शिवाजी कांबळे,एडवोकेट विशाल घोबाळे,अंबाजोगाई पंचायत समितीचे माजी सभापती ज्ञानोबा कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्ष संजीवनी ताई देशमुख,सायगाव चे उपसरपंच रफिक भाई कुरेशी,व्यंकटेश चामनर मदनलाल परदेशी ,मराठवाडा नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री भास्कर भिसे आदर्श मैत्री फाऊंडेशनचे बीड जिल्हा अध्यक्ष श्रीकृष्ण पप्पू उर्फ बाहेती यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत केज विधानसभा व परळी विधानसभा निवडणूक लढणारे उमेदवार एकाच व्यासपीठावर उपस्थित राहून 2024 चे विजन मांडले तसेच मान्यवराकडून अंबाजोगाई दर्शन न्यूज चैनल चे संपादक श्री सतीश मोरे यांचा सत्कार करून 24 व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत गौरी महालक्ष्मी आरास देखावा व पारंपारिक उखाणा स्पर्धेत जनता परीक्षणातून प्रथम क्रमांक परळी तालुका ममदापूरच्या अंगणवाडी सेविका सौ मनकर्णिका अशोकराव कदम,द्वितीय पारितोषिक छत्रपती संभाजी नगरच्या सृष्टी दुर्गेश पंढरपुरे ,तृतीय पारितोषिक अंबाजोगाई तालुका बर्दापूर येथील सौ राधिका अमोल माने,उत्तेजना सौ पल्लवी राहुल बोडके,सौ स्नेहा रमेश कुलकर्णी,श्री व सौ रावसाहेब घाडगे पाटील,सौ वंदना विनोद बर्डे,सो मनीषा श्याम गरड,सौ सीमा सतीश मोरे यांना मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस वितरण करण्यात आले अंबाजोगाई दर्शन न्युज चैनल चा 24 वा वर्धापन दिन यशस्वी करण्यासाठी डिजिटल मीडिया परिषदेचे सर्व पदाधिकारी व सदस्य व मित्रपरिवार यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वतः अंबाजोगाई दर्शन न्यूज चैनल चे संपादक श्री सतीश मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष श्री अभिजीत लोमटे यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचा सत्कार डिजिटल मीडियाचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी केले
