आपला जिल्हामहाराष्ट्र

नंदकिशोर मुंदडा सह तीघांनवर तात्काळ कार्यवाही करा – रोहन गलांडे पाटील (अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा येनार आहे)

केज/ प्रतिनिधी केज अंबाजोगाई मतदार संघातील मौजे जागोईवाडी, ता. अंबाजोगाई, जि. बीड येथील ग्रामपंचायत कार्यालयात महापुरूष यांच्या प्रतीमेसोबत व खाली राजकीय नेते यांची प्रतीमा लावल्याने आमच्या भावना दुखावल्याने तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ केज तालुकाध्यक्ष रोहन गलांडे पाटील यांनी दीला आहे या विषयी सविस्तर वृत्त असे की अंबाजोगाई तालुक्यातील मौजे जोगाईवाडी ग्रामपंचायत कार्यालयात शासकीय नियमानुसार जे राष्ट्रीय महापुरूष व स्वातंत्र्य सैनीक यांचे प्रतिमा लावण्याचा नियम आहे. परंतु सदर महापुरूषांच्या चित्रासोबत समाविष्ट नसलेले व नियमबाह्य स्वर्गीय मंत्री विमलताई मुंदडा यांची प्रतिमा श्री छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या मधोमध प्रतिमा बसवण्यात आली आहे. तसेच सदर प्रतिमेच्या खाली सर्व प्रतिमेपेक्षा मोठा फोटो नंदकिशोर मुंदडा यांचा बसवण्यात आला आहे. सदर बाब व्हिडीओ शुटींग व फोटो मध्ये कैद केली असून, अशा प्रकारे महापुरूषांच्या बरोबरीने राजकीय लोकांचे नियमबाह्य प्रतिमा लावल्याने आम्ही सर्व महापुरूष अनुयायी म्हणुन आमच्या प्रचंड भावना दुखावल्या आहेत. तरी सदर प्रकरणी दोषी ग्रामपंचायतचे सर्व जबाबदार पदाधिकारी कर्मचारी व नंदकिशोर मुंदडा यांचेवर कठोर कारवाई करण्याचे निवेदन आपल्याकडे सादर करण्यात येत आहे. कारवाई न झाल्यास सदर घटनेच्या निषेधार्थ कारवाई केली नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन स्करण्यात येईल असे निवेदनाद्वारे रोहन गलांडे पाटील यांनी म्हटले आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!