ताज्या घडामोडी

औंढे येथील आरोग्य उपकेंद्रच आजारी

Spread the love

लोणावळा :  औंढे खुर्द येथील आरोग्य उपकेंद्र आजारी असून त्याची डागडुजी करून इथे कायमस्वरूपी निवासी परिचारिका किंवा आरोग्य कर्मचारी नेमण्याची गरज आहे. लहान मुलांचे पोलिओ डोस,तसेच कोरोना डोस यासाठी येथील महिलांना शाळेच्या वरांढ्यात मुलांना घेवून डोससाठी दरमहा थांबावे लागते.

या आरोग्य उपकेंद्रात पूर्वी इंगळे म्हणून आरोग्य कर्मचारी नेमणूकीला होते. पण त्यांची बदली इतरञ झाल्यानंतर कुणाचीही नेमणूक करण्यात आलेली नाही. याबाबत कार्ला आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी पोळ , तालुका आरोग्य अधिकारी  चंद्रकांत लोहकरे , आणि पंचायत समितीकडून ताबडतोब दखल घ्यावी , अशी विनंती औंढे , औंढोली ग्रामस्थांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!