ताज्या घडामोडी

निगडीत महिला दिनानिमित्त राजकीय व सामाजिक क्षेत्रातील महिलांचा सन्मान

Spread the love

चिंचवड : काल दि.8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त निगडी सिद्धीविनायक नगरीतील आमदार सुनिल (आण्णा) शेळके यांच्या जनसंपर्क कार्यालयात संपर्क प्रमुख तानाजी काळभोर व मंगल काळभोर यांनी महिला दिनानिमित्त परिसरातील संप्रदाय , भजनी मंडळ,महिला वकील, महिला आशा वर्कर्स,व सामाजिक व राजकीय क्षेत्रात ज्या महिलांनी उल्लेखनीय कार्य केले त्यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला.  तसेच उपस्थित महिलांच्या हस्ते केक कापून महिला दिन साजरा करण्यात आला.

यावेळी सिद्धीविनायक महिला भजनी मंडळ,देहूरोड शहर रा.कॉं.महिला अध्यक्षा शितलताई हगवणे, मा.उपाध्यक्षा लिलावती (काकू) काळभोर,एकता महिला मंडळ अध्यक्षा संगिता (नानी) वाघमारे, अॅड.अनुराधा शिवणखेडे,युवती अध्यक्ष कु.संस्कृती ढगे,तसेच देहूरोड रा.काॅ. उपाध्यक्षा स्वाती इंजे,अमृता जाधव, कावेरी मोरे, रूपाली ढगे,सुरेखा कांबळे यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी मनसंगिता (नाना) वाघमारे यांनी सांगितले कि जी व्यक्ती महिलांचा आदर करते तीच व्यक्ती जागतिक महिला दिनाच्या दिवशी महिलांचा मानसन्मान करते. तसेच अॅड.प्रवीणभाऊ झेंडे,शितलताई हगवणे,कु.संस्कृती ढगे यांनीही महिला दिनाच्या महिलांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी कमल काळभोर,मस्कर मावशी,रत्ना काळभोर,शोभा काळभोर,संगीता झेंडे, तेजश्री झेंडे, कविता राठोड,आशाताई गोदिंल, ठोले काकू, सावंत काकू,सोनवणे काकू,मिना जीवना, आवंढे ताई, शिवाजी काळभोर,किसन करदोरे,खानझोडे काका,रोडे काका,अर्जुन कदम,बाळासाहेब आवंढे,विनायक जाधव,निंतात सोनवणे,खडसन काका,ठोले काका,रोडे काका, तेजस काळभोर,हणुमंत रेवी व परिसरातील जेष्ठ नागरिक व अनेक महिला भगिनी मोठया संख्येने उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तानाजी काळभोर यांनी केले, सूत्रसंचालन बाळासाहेब जाधव यांनी तर सुधीर ढगे यांनी सर्वांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!