ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज उत्सव कार्यकारणी दोन वर्षापूर्वीचीच कायम
तळेगाव : कोरोना महामारीच्या संकटामुळे रद्द करण्यात आलेला ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज उत्सव यंदाच्या वर्षी साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवासाठी दोन वर्षापूर्वीची कार्यकारणी पुन्हा एकदा कायम करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी या निमित्ताने झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला.

तळेगाव दाभाडे येथील ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांचा उत्सव गुढीपाडव्याच्या दिवशी मोठ्या उत्साहात व भव्य प्रमाणात साजरा करण्यात येतो.कोरोना संकटामुळे दोन वर्षांपूर्वी पंचक्रोशी मध्ये प्रसिद्ध असणारा हा उत्सव रद्द करण्यात आला होता. त्यामुळे दोन वर्षांपूर्वीच कार्यकारणी पुन्हा निवडण्यात आली आहे.
या बैठकीमध्ये अध्यक्ष गोकुळ भेगडे यांनी मनोगतात यावर्षीचा डोळसनाथ महाराजांचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येईल असे आवाहन केले. तर खजिनदार प्रणव भेगडे यांनी मागील वर्षीचा अहवाल जाहीर केला.

उत्सव कार्यकारणी पुढील प्रमाणे
अध्यक्ष – गोकुळ भेगडे,
खजिनदार – प्रणव भेगडे,
सरचिटणीस – निरंजन भेगडे,
प्रसिद्धीप्रमुख – अश्विन माने
उपाध्यक्ष – प्रणव दाभाडे, सिद्धार्थ किल्लावाला, अक्षय पाटोळे, चरण भेगडे, स्मितेश भेगडे ,शुभम काकडे, गणेश शेलार
सहखजिनदार – अजय पवार, दर्शन टकले,ओमकार भेगडे, कुणाल भेगडे, समीर दाभाडे, शारुख शेख, ओमकार दाभाडे, स्वप्नील दाभाडे, कुणाल लोंढे



