ताज्या घडामोडी

लायन्स क्लब सुप्रीमोच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त खिचडीचे वाटप

Spread the love

लोणावळा : लोणावळा येथील लायन्स क्लब सुप्रीमोच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त रायवूड येथील  सिद्धेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या शिवभक्तांना खिचडीचे वाटप करण्यात आले.जवळपास अडीच हजार शिवभक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.

यावेळी लोणावळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव,माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, सिद्धेश्वर मंदिराचे विश्वस्त व माजी नगरसेवक विलास बडेकर, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, पिटीसी खंडाळाचे पोलीस निरीक्षक उमेश परदेशी,पत्रकार संजय पाटील, विशाल विकारी,लायन्स क्लब अध्यक्ष सुधीर कदम, पल्लवी शेट्टी ,उदय शेट्टी, गिरीश पारख व विश्वनाथ पुट्टोल तसेच लायन्स क्लब सुप्रीमोचे सदस्य उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!