ताज्या घडामोडी

वडगाव मावळ येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात निर्भय कन्या अभियान उत्साहात संपन्न 

Spread the love

वडगाव : येथील श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य व बी.बी.ए महाविद्यालयात निर्भय कन्या अभियान उत्साहात संपन्न झाले. विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर डी जाधवर, वडगाव बार असोसिएशनच्या सचिव अॅड. सुधा शिंदे यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात अॅड. सुधा शिंदे यांनी स्त्री हक्क अधिकार व सांविधानिक कायदे या विषयावर मार्गदर्शन केले. तर दुसऱ्या सत्रात ऋतुजा सुर्वे यांनी कराटे बॉक्सिंग विषयक माहिती व प्रात्यक्षिके दाखविली.

यावेळी प्राध्यापक अशोक गायकवाड, महादेव वाघमारे, शितल दुर्गाडे, अनिल कोद्रे शितल शिंदे, गजानन वडुरकर, योगेश जाधव, सुखदेव जाधव, जया धावरे,स्वप्नील ठोकळे, अशोक कोकाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी चंदनशिवे तर आभार प्रदर्शन विद्यार्थी विकास अधिकारी संतोष शिंदे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!