ताज्या घडामोडी

कृष्णराव भेगडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

Spread the love

तळेगाव दाभाडे : तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित कृष्णराव भेगडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमास माजी नगराध्यक्षा व जेष्ठ नगरसेविका श्रीमती सुलोचनाताई आवारे, नगरसेविका विभावरी दाभाडे या प्रमुख पाहुणांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून शिवरायांच्या पालखीचे पूजन करण्यात आले.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा मोठा उत्साह दिसून येत होता. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा केली होती.

या कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक श्री.चंद्रकांत काकडे, संस्थेचे अध्यक्ष श्री. संदीप काकडे,सचिव सौ.राजश्री मस्के, शाळेच्या खजिनदार सौ. गौरी काकडे व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मीना अय्यर व सर्व शिक्षक आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!