ताज्या घडामोडी

अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाच्या मावळ तालुका अध्यक्षपदी संजय पाटील यांची एकमताने निवड

Spread the love

तळेगांव : दिनांक १७ फेब्रुवारी २०२२ गुरुवार रोजी अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासचे विश्वस्त व ज्येष्ठ कार्यकर्ते राधेश्याम जगताप,पुणे जिल्हा अध्यक्ष सुरेश टाकळकर,ज्येष्ठ कार्यकर्ते विलास सुर्यवंशी,यांच्या उपस्थितीत समाजसेविका अर्चना म्हाळस्कर थिटे यांच्या बंगल्यावर झालेल्या बैठकीत ॲड संजय पाटील यांची मावळ तालुका अध्यक्ष पदी एकमताने निवड करण्यात आली.

यावेळी तळेगांव नगरपरिषदेचे कार्यक्षम नगरसेवक माहिती अधिकार कार्यकर्ता अरुण माने अर्चना म्हाळस्कर थिटे ,नारायण ढमाले,कविता मोरे,सचिन रगडे, ॲड गणेश जगताप,शिल्पा येवले उपस्थित होते.यावेळी कार्यकर्त्यांनी आपली ओळख आणि करत असलेल्या कामाची माहिती दिली तर विश्वस्त राधेश्याम जगताप आणि पुणे जिल्हा अध्यक्ष सुरेशराव टाकळकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

अण्णा हजारे प्रणित भष्टाचार मावळ तालुका यांचे वतीने शाल पुष्पगुच्छ देवून विश्वस्त जगताप,जिल्हाध्यक्ष टाकळकर,कार्यकर्ते सुर्यवंशी यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी जिल्हा अध्यक्ष सुरेश टाकळकर यांनी मावळ तालुका कार्यकारिणी जाहीर केली.यात अध्यक्ष म्हणून ॲड संजय पाटील,उपाध्यक्ष कविता विजय मोरे,सचिव पदि शिल्पा येवले,सहसचिव नारायण ढमाले,खजिनदार पदी सचिन रगड़े यांची तर जिल्हा सदस्य पदी तळेगांव दाभाडे नगरपरिषद,नगरसेवक अरुण माने,सामाजिक कार्यकर्त्या अर्चना म्हाळस्कर थिटे,प्रकाश पोरवाल यांची निवड करण्यात आली. ॲड संजय पाटील यांनी जिल्हा अध्यक्ष सुरेश टाकळकर आणि विश्वस्त राधेश्याम जगताप यांचे आभार मानले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!