ताज्या घडामोडी

उर्से येथील प्राथमिक शाळेत जागतिक सूर्यनमस्कार दिन उत्साहात साजरा 

Spread the love

ऊर्से : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागतिक सूर्यनमस्कार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शरीर निरोगी राखण्यासाठी सूर्यनमस्कार करणे महत्त्वाचे आहे असा सल्ला अनेक तज्ञांकडून देण्यात येतो.सूर्यनमस्काराचे विद्यार्थ्यांना महत्त्व पटवून देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून सुजाता तारळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यनमस्काराचे 12 मंत्रांच्या संगीत तालावर विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक सादर केले. या शाळेतील पहिली ते सातवी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका निर्मला काळे व शिक्षकांनी सूर्यनमस्कार देण्याचे महत्त्व विशद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!