ताज्या घडामोडी

शेतकरी तरुण मंडळाच्या गणेश मंदिराचा कलशारोहण व लोकार्पण सोहळा संपन्न

Spread the love

तळेगाव : येथील शेतकरी तरुण मंडळाच्या वतीने नव्याने बांधण्यात आलेल्या श्री गणेश मंदिराचा कलशारोहण व लोकार्पण सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला.यावेळी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई आहे तसेच फुलांची सजावट देखील करण्यात आली होती.

गणेश जयंती निमित्त शुक्रवारी गणेशयाग, गणेश जन्म आरती, महाप्रसाद असे धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. हभप ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य सुदाम महाराज भोसले यांच्या हस्ते कलशारोहण पार पडले .आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते आरती घेण्यात आली.

यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, माजी आमदार दिगंबर भेगडे, जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे, माजी उपनगराध्यक्ष वैशाली दाभाडे, माजी नगरसेवक भिमाजी शेळके ,संदीप काकडे, माजी नगरसेविका शोभा भेगडे,संध्या भेगडे यासह मंडळाचे पदाधिकारी सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!