ताज्या घडामोडी

लोणावळ्यातील भांगरवाडीमधील राममंदिर कळसाचे नूतनीकरण संकल्प व भूमिपूजन संपन्न

Spread the love

लोणावळा : श्रीराम मंदीर देवस्थान भांगरवाडी लोणावळा येथील राम मंदीर चे कळसाचे नूतनीकरण करण्याचा संकल्प आणि भूमिपूजन समारंभ आज रोजी दिनांक ५ फेब्रुवारी २०२२ , वसंत पंचमी या शुभ दिवशी साजरा करण्यात आला. विश्वस्त मंडळ सदस्य माधवराव भोंडे , राधिका भोंडे, सा.अंबरचे संपादक सुरेश साखवळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संकल्प करण्यात आला.

राम मंदीर हे श्री भोंडे आणि श्री घमंडे यांच्या जागेवर १९०१ साली बांधण्यात आले होते. नवसारी येथील रहिवासी जोशी यांनी प्रकृती अस्वस्थतेचे कारणामुळे थंड हवेच्या ठिकाणी स्थलांतरित होण्याचे ठरवले. ते १९००साली लोणावळा येथे भोंडे आणि घमंडे यांची जागा भाडे तत्वावर घेवून राहू लागले. जोशी हे दररोज टेकडीच्या बाजूला फिरायला जात असत. तेथील गुहेत एक स्वामी रहात होते. त्यानी एकदा श्री जोशी यांना राम मंदीर बांधण्यास सांगितले. त्यावरून १९०१ साली त्यांनी बांधकामास सुरुवात केली. १९१७ साली मंदीर पूर्णत्वास आले. सदर मंदिराची घटना एकाच ओळीत लिहिली होती.

त्यानंतर मंदिराच्या विश्वस्त मंडळावर बरेच लोक येवून गेले. २१ मार्च २०२१ रोजी श्री माधव शंकर भोंडे यांच्या संचालक पदाची निवड होवून नवीन विश्वस्त मंडळ उदयास आले. त्यानंतर त्या ट्रस्ट मधील बऱ्याच कायदेशीर बाबींची पूर्तता करून नवीन घटना लिहिण्यात आली. सदर मंदिराचे बांधकाम हे उत्तम स्थितीत असल्याने ते तसेच ठेवून मंदीर परिसराचे सुशोभीकरण करावे असे ठरले. या प्रसंगी काही लोकांनी आर्थिक मदत दिली. मंदिराचा कळस हा भव्य आणि दिव्य असावा असे वाटून श्री माधव भोंडे यांनी सज्जनगड सातारा येथील राम मंदिराच्या कळसाची प्रतिकृती उभारण्याचा संकल्प केला. या कामासाठी नांदेड हून कामगार मागविण्यात आले. आज रोजी या शुभ कामाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. अध्यक्ष  माधव भोंडे यांच्या पुढाकारातून हे काम करण्यात येणार आहे.

या मंदीर परिसरात खूपशा मोठ्या लोकांचा वास होता. श्री दासगणू महाराज यांचे देखील वास्तव्य या मंदिरात खूपदा असे. यावेळी मिलिंद खळदकर संजय खळदकर , मंदिराचे पुजारी मनोहर जोशीं किरीट जोशी माजी नगरसेवक विजय मोरे, बाळासाहेब राणे ,दत्तात्रय येवले ,हरीश भोंडे, अजित घमंडे, जेष्ठ पत्रकार चंद्रकांत जोशी श्रीराम कुमठेकर, समीर काचरे यांचेसह नवमी भजनी मंडळ सदस्य उपस्थित होते.यावेळी नवमी भजनी मंडळच्या वतीने मंदिर कामा करिता एक लाख रुपयांची देणगी जाहीर करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!