ताज्या घडामोडी

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी च्या पदाधिकाऱ्यांची प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्ण कल्याण समिती वर सदस्यपदी नियुक्ती

Spread the love

तळेगाव  : तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी अध्यक्ष नितीन मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली आज प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉक्टर उन्मेश गट्टे यांच्या हस्ते रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचे संस्थापक अध्यक्ष विलास जी काळोखे व रोटरीयन्स किरणजी ओसवाल यांना रुग्ण कल्याण समिती सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली.

तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्र हे मावळ तालुक्यातील सर्वाधिक लसीकरण करणारे केंद्र ठरलेले असून अनेक नागरिकांना तेथे कोरोनाचे दोन्ही डोस पूर्ण करून करून देण्यात आलेले आहे.तेथील वाढती संख्या व जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम पोहोचावे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र येथे चांगल्या सुविधा नागरिकांना मिळाव्यात यासाठी अवगत तंत्र ज्ञान असलेले साधन सामुग्री साठी रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी पूर्णपणे प्रयत्न करणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे व पदाधिकारी किरण ओसवाल यांनी सांगितले आहे.

त्याप्रसंगी रोटरी क्लबचे ऑफ तळेगाव दाभाडे सीटी संस्थापक अध्यक्ष तसेच नवनिर्वाचित रुग्ण कल्याण समिती सदस्य विलास काळोखे ,पदाधिकारी किरण ओसवाल, पदाधिकारी संतोष लोणकर केंद्रप्रमुख डॉ. उन्मेश गट्टे, डॉ.राजेंद्र मोहिते यांच्या समवेत नवनिर्वाचित समिती सदस्य पदी नियुक्त झालेले तानाजी मराठे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!