ताज्या घडामोडी

मोठी बातमी ! दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार 

Spread the love

मुंबई : इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

राज्य बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाइन होणार की ऑफलाइन याबाबत गेल्या काही दिवसांपासून संभ्रम होता .मुंबईत व पुण्यात विद्यार्थ्यांचे आंदोलन झाल्यामुळे परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते.

गोसावी यावेळी म्हणाले की, परीक्षा ऑफलाईन पद्धतीने आणि ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होईल. गैरसोय होऊ नये म्हणून विद्यार्थी त्यांच्या शाळेतच पेपर देऊ शकतील. या संदर्भात आम्ही मुख्याध्यापक, विद्यार्थी यांच्याशी चर्चा केली आहे. अपरिहार्य कारणास्तव विद्यार्थ्यांना परीक्षा किंवा एखादा पेपर देता येत नसेल तर त्यांना पुन्हा संधी देण्यात येईल.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!