ताज्या घडामोडी

पिंपरीत पोलिसांनी काढली दहशत पसरविणाऱ्या स्वयंघोषित भाईंची धिंड 

Spread the love

 

पिंपरी : येथील तरुणाला मारहाण करून कुत्र्याचे बिस्किट खायला घालणा-या स्वयंघोषित भाईंची पोलिसांनी धिंड काढली आहे. या स्वयंघोषित भाईने एका तरुणाला बेदम मारहाण करत परिसरात दहशत पसरवली होती. भाई न बोलणाऱ्या तरुणाला आठ ते दहा गुंडांनी बेदम मारहाण केली. यासंदर्भात पिडीत युवकाने वाकड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

प्रशांत आठवडे, आदित्य काटे, प्रेम शिंदे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुत्र्याला खायला देण्यात येणारी बिस्कीटे आरोपींनी प्रथमेश राजेंद्र दबडे याला जबरदस्तीने खायला घालून नंतर कंबरेचा पट्टा काढून त्यास बेदम मारहाण केली. तसेच या मारहाणीचा व्हिडिओही काढला.

या स्वयंघोषित भाईंना पोलिसांनी त्यांचे मुंडण करून धिंड काढत चांगलाच धडा शिकवला. सात आरोपींपैकी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. फरार असणाऱ्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!