ताज्या घडामोडी

लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांना पीपीई किटचे वाटप 

Spread the love

लोणावळा :  लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छता विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना आज पीपीई किटचे वाटप करण्यात आले. यात सॅनिटायझर, साबण, मास्क आदी वस्तूंचा समावेश आहे. लोणावळा शहर स्वच्छ सुंदर बनवण्यात स्वच्छता विभागातील कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे.

लोणावळा नगरपरिषदेने सलग चार वर्षे स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये देशभरात नामांकन मिळवले. यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या कर्मचाऱ्यांना पिपीई किट देऊन नगर परिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

स्वच्छ सर्वेक्षण अभियान 2022 अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला.यावेळी शहर स्वच्छतेची व पर्यावरण रक्षणाची शपथ घेण्यात आली.यावेळी उपमुख्याधिकारी  भगवान खाडे ,स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचे समन्वयक अक्षय काळे, सोनाली सासवडे व अन्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!