आजपासून मावळातील पर्यटन स्थळे पर्यटनासाठी खुली
लोणावळा : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यासह लोणावळा येथील पर्यटन स्थळे आजपासून खुली करण्याचे आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी काल दिले आहेत.तसेच या परिसरातील छोट्या व्यावसायिकांनी दुकाने हे खुली करावीत असे आदेशात म्हटले आहे.

पुणे येथे झालेल्या आढावा बैठकीत पर्यटनस्थळांवरील छोट्या व्यावसायिकांना व्यवसाय करण्याची मुभा देण्याच्या सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी रविवारी प्रशासनाला दिल्या होत्या.
या निर्णयामुळे मावळसह लोणावळ्यातील पर्यटन स्थळ खुली होणार आहेत. यामुळे पर्यटन स्थळांवर व्यवसाय करणाऱ्या लहान व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. या ठिकाणी व्यावसायिक व पर्यटकांनी कोरूना नियमांचे पालन करावे, मास्कचा वापर करावा, गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.




