ताज्या घडामोडी

वाल्हेकर वाडी येथे पार्थ पवार फाउंडेशनच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन

Spread the love

चिंचवड : येथील वाल्हेकरवाडी मध्ये पार्थ फाउंडेशन व समर्थ आय केअर यांच्या संयुक्त विद्यमाने  मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन 23 जानेवारी रोजी विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन धनंजय वाल्हेकर यांनी केले होते.

या शिबिरात डोळे, ब्लड प्रेशर, शुगर ,ऑक्सिजन लेवल, वजन, बॉडी मास इंडेक्स अशा सहा प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या. 212 कुटुंबांनी या शिबिराचा लाभ घेतला.

यावेळी बोलताना धनंजय वाल्हेकर म्हणाले ,सध्या आपण कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचख सामना करत आहोत. अशा वेळी आपल्या शरीराविषयी आपल्याला माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे यासाठी नागरिकांच्या मोफत तपासणी आरोग्य शिबिराचे आयोजन केले.

यावेळी डॉ. सुमित्रा घावरी, डॉ. कार्तिक थोरात, नवनाथ आखाडे, सागर हिपकर यांनी नागरिकांच्या तपासण्या केल्या.या मोहिमेसाठी विकास वाल्हेकर, सुनील वाल्हेकर, संदीप वाल्हेकर, वसंत ढवळे, सचिन वाल्हेकर, बाजीराव वाल्हेकर ,विशाल गायकवाड, अजिंक्य वाल्हेकर, महिपती मगर ,दुर्वेश सुर्वे, चेतन कानजवणे, तुषार जाधव, बाबू नढे ,शुभम वाल्हेकर, ऋत्विक वाल्हेकर, विराज वाल्हेकर ,तेजस वाल्हेकर, चेतन वाल्हेकर हे मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!