ताज्या घडामोडी

लोणावळ्यात सर्व पाट्या मराठीत करा अन्यथा मनसे स्टाईल दाखवू – मनसेचा इशारा 

Spread the love

लोणावळा : राज्य सरकारने मंत्रीमंडळात महाराष्ट्र आस्थापना कायदा अंतर्गत दुरुस्ती करत दुकानांच्या पाट्या मराठी देवनागरी करणे सक्तीचे केले आहे. त्यानुसार लोणावळ्यात सर्व पाट्या मराठीत करा अन्यथा मनसे स्टाईल दाखवू असा इशारा मुख्याधिकार्‍यांना मनसेच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला.

राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी. येत्या पंधरा दिवसात मराठीत मोठ्या अक्षरात पाट्या लावण्याचे आदेश लोणावळा नगरपरिषदे मार्फत काढण्यात यावेत असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी मनसे लोणावळा शहराध्यक्ष भारत चिकणे, मावळ तालुका उपाध्यक्ष रमेश म्हाळसकर,तालुका माथाडी अध्यक्ष निखील भोसले, मावळ तालुका टेलिकॉम अध्यक्ष रफिक शेख,टेलिकॉम उपाध्यक्ष रितेश भोमे,संघटक मधुर पाटणकर, विभाग अध्यक्ष अभिजित पाहिजे,रोहिदास शिंदे, अजिंक्य बोभाटे,कैवल्य जोशी आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!