ताज्या घडामोडी

पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई ; विक्रीसाठी आणलेल्या चौदा पिस्तुल आणि आठ जिवंत काडतुसे पकडली

Spread the love

चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहर परिसरात एका टोळीने मध्यप्रदेश मधून विक्रीसाठी आणलेल्या 14 पिस्तूल आणि08 जिवंत काडतुसे पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने पकडले.

आकाश अनिल मिसाळ( वय 21 रा. इंद्रायणीनगर भोसरी) रुपेश सुरेश पाटील (वय,30 रा. वडगाव बुद्रुक ता. चोपडा जि. जळगाव) दिलीप तापकीर (वय 26 ,रा. सुतारवाडी, पाषाण अजित उर्फ रामलाल गुप्ता ,( वय 28, रा.भोसरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस नाईक सागर शेंडगे यांना मिळालेल्या माहितीनुसार वडमुखवाडी च-होली येथील एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच संशयितांची खबर मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, उपनिरीक्षक मंगेश भांगे यांच्या पथकाने सापळा लावून तीन आरोपींना अटक केले. त्यांच्याकडून दोन पिस्तुले, जिवंत काडतुसे, 3 मोबाईल, मिरचीपूड, नायलॉन दोरी असा ऐवज पोलिसांनी जप्त केला.

आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. पोलीस कोठडीत आरोपींनी एकाला पिस्तूल विकल्याचे सांगितले पोलिसांनी सापळा लावून अजित गुप्ता याला अटक करून दोन पिस्तुल आणि एक जिवंत काडतुसे त्याच्याकडून जप्त केले. तर कोठडीतील आरोपी यांच्या घराची झडती घेतली असता दहा गावठी कट्टे आणि जिवंत काडतुसे मिळून आली .पोलिसांनी हा शस्त्रसाठा जप्त केला.

पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे,सहाय्यक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे, पोलीस अंमलदार महेश खांडे,उमेश पुलगम, नितीन लोखंडे, आशिष बनकर, सागर शेडगे, गणेश कोकणे, राजेश कौशल्ये, राहुल खारगे,विक्रांत गायकवाड, राजेंद्र शिंदे, औदुंबर रोंगे,नागेश माळी,  यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!