ताज्या घडामोडी

लोणावळ्याच्या भगवान महावीर चौकात रस्ता दुभाजकाचे काम ठप्प ;नागरिकांकडून चौकशीची मागणी

Spread the love

लोणावळा : लोणावळ्याच्या भगवान महावीर चौकात रस्ता दुभाजकाचे काम ठप्प झाले असून हे काम नगरपरिषदेच्या वतीने काम थांबले याबाबत नागरिकांकडून चौकशीची मागणी करण्यात येत आहे.

भगवान महावीर चौकात तत्कालीन सत्तारूढ पक्षाकडून ठराव घेवून स्थानिक वलवण येथील ठेकेदार यास दिले होते. ते काम आर्धवट चालू असताना कुणीतरी ते थांबवले असा आरोप माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव यांनी काही नगरसेवक , नगरसेविका यांचे उपस्थितीत केला होता.

तेथे मुख्याधिकारी सोमनाथ जाधवही फाईल घेवून कामाबाबत स्पष्टीकरण करण्यासाठी गेले होते , पण या कामाबाबत त्यांचेकडून किती प्रयत्न झाले , काय झाले काहीच माहीती नागरिकांना मिळाली नाही. काम पुन्हा सुरू न झाल्याने मुख्याधिकारी यांची शिष्टाई फळाला आली नाही.काम पुन्हा सुरू झाले नसल्यामुळे येथे सिमेंट चे ब्लाॕक दुभाजकावर लावून ठेवलेले आढळत आहे. या ठिकाणी आमदार , खासदार यांचेतर्फे निधी आणून मोठे प्रवेशद्वार उभारल्यास लोणावळा शहरात आल्यासारखे पर्यटकांना वाटेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!