ताज्या घडामोडी

पिंपरी चिंचवड पोलिसांची शाळा कॉलेज परिसरातील रोडरोमियों वर धडक कारवाई

नागरिकांकडून कारवाईचे स्वागत!!!

Spread the love

पिंपरी : पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीतील निगडी पोलीस स्टेशन परिसरातील शाळा, कॉलेजमधील भरधाव वेगाने गाडी चालवणाऱ्या रोड रोमियोंवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

पिंपरी-चिंचवड परिसरात अनेक शाळा ,महाविद्यालय व  कॉलेज आहेत. शाळा बंद असल्या तरी  महाविद्यालय  मात्र सुरू आहेत. या महाविद्यालयातील काही रोडरोमियो भरधाव वेगाने वाहन चालवत फिरत असतात . कधीकधी ट्रिपल सीट वाहने चालवताना उगाचच कर्णकर्कश्श हॉर्न वाजवतात अशा प्रकारांचा ज्येष्ठांना त्रास होतो.

उगाचच शिट्ट्या मारत फिरणा-या तसेच अशाप्रकारे बेदरकारपणाने वाहन चालवणाऱ्या, दुचाकीवरून विना लायसन्स फिरणा-या बेशिस्त वाहन चालकांवर पोलिसांनी  धडक कारवाईची मोहीम सुरू केली आहे.

कॉलेज कुमारांवरती पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.निगडी परिसरात असलेल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या छेडछाडीच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी सुरू केलेल्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत आहे. या कारवाईमुळे रोडरोमियोंना आळा बसेल. यामुळे पालक वर्ग आनंदात आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!