ताज्या घडामोडी

पुणे जिल्ह्यातील कोरोना मुक्त गावाला मिळणार 50 लाखांचे बक्षीस

Spread the love

 

पुणे : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे .राज्यात यामुळे कडक निर्बंध लावण्यात येत असून लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. तरीदेखील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने एक आगळ्यावेगळ्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत विजयी होणाऱ्या गावाला पन्नास लाख रुपये रोख रक्कम बक्षिस म्हणून देण्यात येणार आहे. ‘कोरोना मुक्त गाव’ असे या स्पर्धेचे नाव आहे .

कोरोना मुक्त गाव या स्पर्धेचे आयोजन पुणे जिल्ह्यातील गावांसाठी करण्यात आले असून ही स्पर्धा जानेवारी 10 ते 15 मार्च दरम्यान चालणार आहे. पुणे जिल्ह्यातील उत्कृष्ट गावांना बक्षीस देण्यात येणार आहेत .प्रथम क्रमांकासाठी 50 लाख रुपये द्वितीय क्रमांकासाठी 25 लाख आणि तृतीय क्रमांकासाठी 15 लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.

या बाबतची नियमावली व माहिती ग्रामपंचायतींना पाठवण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!