ताज्या घडामोडी

जुना टारझन चिञपटातील हेमंत बिर्जे यांच्या गाडीला एक्सप्रेस वे मार्गावर अपघात

पत्नी आमना व मुलगी रेश्मा किरकोळ जखमी

Spread the love

लोणावळा : जुना टारझन चिञपटातील हेमंत बिर्जे यांच्या गाडीला एक्सप्रेस वे मार्गावर अपघात ;पत्नी आमना व मुलगी रेश्मा किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना पवना हाॕस्पिटलमधे दाखल करण्यात आले असून त्याचेवर उपचार सुरू आहेत.

मुंबई वरून पुण्याला जाताना मुंबई पुणे महामार्गावर हा अपघात होऊन गाडी दुभाजकावर आदळून सौ.अमना हेमंत बिर्जे यांचे डोक्याला मार लागला असून त्यांचे जखमेवर टाके घालण्यात आले असल्याचे हेमंत बिर्जे यांनी रूग्णालयातून माध्यमांशी बोलताना सांगितले .

गाडी चालवत असताना गळ्यात कसेतरी खवखवल्याने त्यांनी गोळ्या घेतल्या .त्या गोळ्यांमुळे त्यांना चक्कर आल्यासारखे झाले. त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटून ती दुभाजकावर आदळून तिघेही किरकोळ जखमी झाले .पोलिसांनी त्यांची गाडी मार्गावरून बाजूला घेतली व अपघातात जखमी झालेल्या तिघांनाही सोमाटणे फाटा येथे पवना रूग्णालयात दाखल केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!