ताज्या घडामोडी

लोणावळा नगरपरिषदेच्या दोन्हीही सभा झाल्या तहकूब

Spread the love

लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेच्या विशेष सभा व सर्वसाधारण सभा आज सकाळी अकरा वाजता आॕनलाईन घेण्याचे आदेश आल्याने व तांत्रिक कारणांमुळे रद्द ( विपगत ) केल्याचे नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव यांनी आवाज प्रतिनिधीशी बोलताना सांगितले .

त्यांनी उपस्थित न राहता माध्यमांशी बोलून एका दिवसात , आठ तासांच्या काळात आपल्यावर आरोप केले ते खोटे आसल्याचे सांगून माजी नगरसेवक प्रमोद गायकवाड व नगरसेविका पूजा गायकवाड यांचेवर टीका केली. महिलांसारखे , रूसणे , फुगणे अशी कामे आज शेवटच्या दिवशी करायची गरज नव्हती. पाच वर्षे सत्तेत वाटेकरी होतात;पण आठ तासात नेमके काय घडले ? असा प्रश्न उपस्थित केला.

लोणावळा नगरपरिषदेच्या विशेष सभेला कोरमच नसल्यामुळे यापूर्वी ती तहकूब करण्यात आली होती. आज तहकूब झालेली सभा पुन्हा बोलावून दुपारी साडेतीन वाजता आणखी एक सर्वसाधारण सभा घेण्यात येणार होती. बरेच विषय या सभेत होते. सुमारे सात , आठ सत्तारूढ गटातील नगरसेवक व नगरसेविका हे उपस्थित न राहता आमदार सुनिलआण्णा शेळके यांना भेटायला गेल्याची वारेमाप चर्चा लोणावळा शहरात पसरली होती. त्यामुळे काही नगरसेविका यांनी माध्यमांशी बोलून नगराध्यक्षा यांनी सभा बोलावल्या ;पण आम्हाला विश्वासात न घेता मर्जीतीलच विषय विषयपञिकेवर घेवून आम्हाला विचारले नाही,म्हणून आम्ही उपस्थित राहणार नसल्याचे शिवसेना नगरसेविका कल्पनाताई आखाडे व राष्ट्रवादी काँग्रेस मधे गेलेल्या नगरसेविका आरोही तळेगावकर व भाजपच्या नगरसेविका गौरीताई मावकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले .

यावेळी उपनगराध्यक्ष दिलीपशेठ दामोदरे , आरोग्य समिती सभापती रचना सिनकर , नगरसेविका बिंद्रा गणाञा , मंदाताई सोनवणे , जेष्ट नगरसेवक श्रीधर पुजारी , नगरसेवक देविदास कडू , नगरसेवक ललीत सिसोदिया , माजी शिक्षण मंडळ सभापती आशिष बुटाला आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!