ताज्या घडामोडी

मायलॉर्ड” शब्द आता होणार नजरेआड ?

Spread the love

नवी दिल्ली : वकिलांनी न्यायाधीशांना ‘मायलॉर्ड’ किंवा ‘योर ऑनर’ या शब्दांनी संबोधणे थांबवावे, अशी सूचना ओडीशा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एस. मुरलीधर आणि न्यायमूर्ती आर. के. पटनायक यांनी प्रसिद्ध केले आहे.

न्यायाधीशांना संबोधित करताना वकिलांनी मायलॉर्ड, यॉर ऑनर या उपसर्गाचा वापर करू नये. न्यायालयाच्या सभ्यतेनुसार संबोधनासाठी ‘सर’ यासह इतर कोणत्याही शब्दांचा वापर करता येऊ शकतो, आशा सूचना करण्यात आल्या आहेत.

यापूर्वी २००९ साली दिल्ली उच्च न्यायालयात असताना न्यायमूर्ती मुरलीधर यांनी योर लॉर्डशिप संबोधू नये असे वकिलांना सूचित करण्यात आले होते. मार्च २०२० मध्ये पंजाब – हरियाणा उच्च न्यायालयाच्या वकिलांना सुद्धा त्यांनी अशाच सूचना केल्या होत्या. न्यायाधीशांना मायलॉर्ड किंवा योर लॉर्डशिप म्हणल्याने भारतात इंग्रजांच्या वसाहत काळाची झलक दिसून येते, असे बार कौन्सिल ऑफ इंडियाने २००६ रोजी म्हणले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!