ताज्या घडामोडी

पुणे जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा 30 जानेवारीपर्यंत बंद – अजित पवार

Spread the love

पुणे : जिल्ह्वातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्र्वभूमीवर 30 जानेवारी 2022 पर्यंत पहिली ते आठवीच्या शाळा बंद ठेवाव्यात असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले आहेत.

विधान भवन येथे आयोजित पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन बैठकीत ते बोलत होते.बैठकीस ग्रहमंत्री दिलीप वळसे-पाटील,आरोग्य मंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, वंदना चव्हाण,विभागीय आयुक्त सौरभ राव जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय, खाजगी अशा सर्व आस्थापनांमध्ये कोविड लसीच्या दोन मात्रा न घेणाऱ्यांना प्रवेश देण्यात येऊ नये असेही ते म्हणाले.

पवार यावेळी म्हणाले, ओमिकाॅन विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. संसर्गाची स्थिती बिकट होत आहे.105 देश भारतातील 23 राज्य आणि राज्यातील 11 ठिकाणी ओमिकाॅनचे रुग्ण आढळले आहे. पुणे शहरात एकाच दिवसाचा पॉझिटिव्हिटी दर 18 टक्के आहे. या पार्श्वभूमीवर 30 जानेवारीपर्यंत पहिली ते आठवीचा वर्ग बंद राहतील. मात्र ऑनलाइन शिक्षण सुरू राहील. तसेच 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात येत असल्याने नववी आणि दहावीच्या वर्ग सुरू ठेवावेत अशा सूचना त्यांनी दिल्या.

मास्क नसेल तर दंड

कोविडपासून बचावासाठी मास्कचा उपयोग आवश्यक आहे.त्यामुळे मास्क न वापरणाऱ्यांना 500 रुपये दंड आकारण्यात यावा. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकूणा-यांवर 1000 रुपये दंड आकारण्यात यावा आणि या निर्देशांचे कठोरतेने पालन करावे असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!