ताज्या घडामोडी

भुशी डॕममध्ये बुडून मुंबईच्या तरूण पर्यटकाचा मृत्यू

Spread the love

लोणावळा : भुशी डॕममध्ये बुडून मुंबईच्या तरूण पर्यटकाचा मृत्यू झाला. रेल्वेच्या मालकीच्या या भुशीडॕमकडे जाण्यास पर्यटकांना मज्जाव असून तेथील रेस्टहाऊसजवळ खोल पाण्यात पाय घसरून पडल्याने तरूण पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला .

सोहेल अहमदअली शेख (वय-१९, रा -प्लॕट नंबर -१७, लाईन नंबर -एन, रूम नंबर -२, गोवंडी , मुंबई -४३) असे मृताचे नाव आहे. याबाबत लोणावळा शहर पोलिसांना मृताचे वडील अहमदअली अब्दुलसईद शेख (वय-४९,रा , गोवंडी , मुंबई ) यांनी खबर दिल्यावरून लोणावळा शहरचे पोलिसांनी स्थानिक तरूणांचे मदतीने त्यास पाण्याबाहेर काढले.

लोणावळा शहर पोलिसांनी त्यास तात्काळ खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तो उपचारापूर्वीच मरण पावल्याचे डाॕक्टरांनी घोषित केले. लोणावळा शहरचे पोलिस निरिक्षक सिताराम दुबल यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक बढे यांनी खंडाळा येथील आरोग्य पथकामधे उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांचे ताब्यात दिला.पावसाळा नसतानाही या तरूणाचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!