ताज्या घडामोडी

आंबेगाव तालुक्यातील कळंब येथून नऊ लाखांचा बनावट दारू साठा हस्तगत 

Spread the love

नारायणगाव : राज्य उत्पादन शुल्क विभाग नारायणगाव कार्यालयाच्या वतीने छापा टाकून आंबेगाव येथील कळंब येथून 9 लाख 14 हजार 432 रुपये किमतीचा बनावट देशी व विदेशी दारूसाठा हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती उत्पादन शुल्क निरीक्षक अर्जुन पवार यांनी दिली.

याबाबत अधिकाऱ्यांना  आंबेगाव तालुक्यातील कळंब येथील पंचमी हॉटेल जवळील कच्चा रस्त्याच्या कडेला 30 डिसेंबर रोजी रात्री बनावट देशी व विदेशी दारूचा साठा विक्रीसाठी येणार होता अशी माहिती मिळाली.

त्यानुसार सापळा लावून सागर तुकाराम कातोरे व मयूर बाळासाहेब कातोरे (दोघेही रा. चिंबळी तालुका खेड) या दोघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

नारायणगावचे पोलीस निरीक्षक अर्जुन पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार ही बनावट दारू काळेवाडी( ता. हवेली) येथे बनवण्यात येत होती. त्या ठिकाणी उत्पादन शुल्क अधिकारी व कर्मचाऱ्यांनी छापा टाकून दारू बनविण्यासाठी लागणारे स्पिरिट, इसेन्स, मशिनरी, बाटल्या, बूच व कच्चामाल यासह 14 देशी दारूचे बॉक्स, 1 विदेशी दारूचा बॉक्स  व टेम्पो ताब्यात घेण्यात आला.

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!