ताज्या घडामोडी

कोरोना निर्बंधांमुळे बैलगाडा शर्यतीला ग्रहण

Spread the love

तळेगाव : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर तब्बल सात वर्षांनी राज्यात बैलगाडा शर्यती भरवण्यात येणार होत्या. पुणे जिल्ह्यातील मावळ येथील तळेगाव आणि आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे या स्पर्धांसाठी जय्यत तयारी सुरू होती. बैलगाडा शर्यतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सशर्त परवानगी दिली होती. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे नवीन निर्बंध गुरुवारी रात्री जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी 50 जणांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यतींवर निबंध आल्याने बैलगाडा मालक व चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी 1 जानेवारी 2020 रोजी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे.या शर्यतीं करीता बैलगाडा घाट सज्ज करण्यात आला आहे. परंतु आज मध्यरात्रीपासून कोरोना निर्बंध लागू झाले असल्याने बैलगाडा शर्यतींना ग्रहण लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!