ताज्या घडामोडी

लायन्स क्लबच्या वतीने पवन मावळात मधमाशी पालन प्रशिक्षण शिबिर

Spread the love

पवन मावळ : येथे दि. २७ डिसेंबर रोजी लायन्स क्लब पुणे प्राधिकरण तर्फे पवन मावळातील घेवंडे गावातील महिला बचत गटाला एक दिवसीय मधमाशी पालन प्रशिक्षण मोफत देण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये २० महिलांनी सहभाग घेतला होता.

सदर कार्यक्रमास लायन्स क्लबचे अध्यक्ष  भुपेंद्र सिंग,  विजय सुद, कमारा,  विशाल महाजन ,जयकुमार गोगावले, तसेच घेवंडे गावातील सरपंच ताईबाई रघुनाथ बोडके, राजश्री भरत सुतार, धनश्री दत्ता पवार, पोलीस पाटील अनंता खैरे व सामाजीक कार्यकर्ते भरत सुतार इ. मान्यवर उपस्थित हाेते.

सदर प्रशिक्षण शिवसागर मध उद्योगाचे संस्थापक विजय ओंकार महाजन यांचा वतीने देण्यात आले. निता विशाल महाजन व शूभांगी जयकुमार गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम संपन्न करण्यांत आला .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!