ताज्या घडामोडी

विनापरवाना दारू विक्री करणाऱ्यांवर  लोणावळा पोलिसांची कारवाई ; तीन जणांवर गुन्हा दाखल 

Spread the love

लोणावळा : कार्ला व औंढे परिसरात विनापरवाना दारू विक्री करणाऱ्या तिघांवर लोणावळा पोलिसांनी कारवाई केली आहे. या तीनही जणांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 ई अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी दिली.

नंदू पांडुरंग हुलावळे, संतोष चिंधु शिळवणे, वैभव पांडुरंग चव्हाण अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून अकरा हजाराचा माल जप्त करण्यात आला आहे.

नववर्षाच्या निमित्ताने लोणावळा शहर व ग्रामीण भागात सेलिब्रेशन करण्यात येणार आहे.या निमित्ताने लोणावळा ग्रामीण पोलिसांनी ही विशेष मोहीम राबविली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे व लोणावळा विभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश माने, पोलीस उपनिरीक्षक सचिन बनकर,अनिल लवटे, सहा. फौजदार बोकड, पोलीस हवालदार शकील शेख, अमित ठोसर,गणेश होळकर, शरद जाधवर ,भूषण कदम, किशोर पवार, विनोद गवळी, सिद्धेश्वर शिंदे, रईस मुलाणी, आहे अरुण पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!