ताज्या घडामोडी

तळेगावात १७ वर्षीय दशांत परदेशी वर अज्ञाताचा गोळीबार; तरुणाचा मृत्यू 

Spread the love

तळेगाव : तळेगाव दाभाडे येथे १७ वर्षीय दशांत परदेशी वर अज्ञाताने केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे येथील नॅशनल हेवी कंपनी जवळ गुरुवारी मध्यरात्री अज्ञातांनी दशांत परदेशी याच्यावर गोळीबार केला त्यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

रात्री साडेबारा वाजता घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.

तळेगावातील आदर्श विद्या मंदिराचा दशांत हा विद्यार्थी होता.या हल्ल्या मागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही .अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तळेगाव दाभाडे पोलिस पुढील तपास करीत आहे.

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!