ताज्या घडामोडी

लोणावळा परिसरात श्री दत्तमंदिरात भजन , प्रवचन , कीर्तन आदी कार्यक्रम संपन्न

Spread the love

लोणावळा :  अञी आणि अनुसयासूत श्री दत्तमहाराज यांचा जन्मदिवस आभिषेक , पूजा ,भंडारा महाप्रसाद , श्री दत्तजयंती सोहळा , श्री दत्तजन्माचा पाळणा आणि अनेक म़दिरात भजन ,कीर्तन,विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने साजरा करण्यात आला.

लोणावळ्यात जयचंद चौकात श्री दत्तजयंती निमित्ताने मंदिराची फुलांनी व विद्युत रोषणाई करण्यात आली. येथे श्री दत्त आॕटो रिक्षा संघटना यांचेकडून सर्व पूजा , अभिषेक व भंडारा कार्यक्रम संपन्न झाला.

औंढे खुर्द येथे श्री दत्त मंदिरात श्री दत्ताञेय आणि श्री.कानिफनाथ महाराज मुर्तींची आकर्षक फुलांची सजावट केली होती. पूजा व अभिषेक तसेच भंडारा महाप्रसाद कार्यक्रम संपन्न झाला. कुसगाववाडी येथील श्री दत्तजन्माचा सोहळा , सत्यनारायण पूजा , अभिषेक आणि प्रवचन तसेच श्री दत्तजन्म कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

दत्तवाडी येथे श्री दत्तजन्म सोहळ्याचे निमित्ताने तीन दिवस विविध कार्यक्रम संपन्न झाला.यात खेळ रंगला पैठणीचा , हा कार्यक्रम तसेच भंडारा महाप्रसाद कार्यक्रमाने , नृत्यस्पर्धा आणि भजन आदी कार्यक्रम झाले. प्रेमनगरचे श्री दत्तमंदिरात श्री दत्तजयंती निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. काल ह.भ.प.जयश्रीताई  येवले यांचे कीर्तन झाले.

 श्री दत्तजयंती निमित्ताने कीर्तन आणि आज ता.१९ रोजी काल्याचे कीर्तन व महाप्रसाद कार्यक्रमाने सप्ताहाची सांगता होईल. लोणावळा ग्रामिण पोलिस स्टेशनजवळ श्री दत्तमंदिराचे आवारात श्री दत्तजन्माचा सोहळा पूजा , अभिषेक व महाप्रसाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!