ताज्या घडामोडी

नवीन समर्थ विद्यालयात लायन्स लायब्ररी उद्घाटन सोहळा संपन्न

Spread the love

तळेगाव : लायन्स क्लब ऑफ लोणावळा, लायन्स क्लब ऑफ तळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन समर्थ विद्यालयात शुक्रवार (दि १७ डिसेंबर) रोजी लायन्स लायब्ररी सोहळा संपन्न झाला. त्यानिमित्ताने लायन्स क्लबने विद्यालयास शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरतील असे अनेक उत्तमोत्तम, दर्जेदार ग्रंथ भेट दिले.

याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमिला वाळुंज होत्या. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक गुरुवर्य अण्णासाहेब विजापूरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. लायन विजया खंडेलवाल यांनी ग्रंथालयाचे उद्घाटन केले .

सर्व पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.विद्यार्थ्यांनी पाहुण्यांच्या समोर परिपाठ सादर केला. ईशस्तवन व स्वागतगीताने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी विद्यालयाच्या संस्कृत अध्यापिका प्रभा काळे मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रम प्रसंगी आलेल्या सर्व मान्यवरांचा शालेय समितीचे अध्यक्ष मा. श्री महेश भाई शहा यांनी स्वागत व सत्कार केला.

विद्यालयाचे पालक सदस्य माननीय श्री राजेशजी म्हस्के, लायन विजया खंडेलवाल, लायन डॉक्टर हिरालाल खंडेलवाल, लायन दीपक बाळसराफ, लायन डॉक्टर शाळीग्राम भंडारी या मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सौ प्रमिला वाळुंज यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि ग्रंथालयाचे महत्व सांगितले. श्री रेवप्पा शितोळे सर व सौ प्रभा काळे मॅडम यांनी सूत्रसंचालन केले.शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री.कैलास पारधी सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शालेय समितीचे अध्यक्ष महेश भाई शहा, शाळेचे मुख्याध्यापक श्री कैलास पारधी सर, पर्यवेक्षक श्री वाजे सर, ग्रंथालय प्रमुख सोनल गायकवाड मॅडम व सर्व शिक्षक,सेवक, यांचे मोलाचे सहकार्य लाभले. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्रीयुत संजय ऊर्फ बाळा भेगडे व सचिव श्री संतोषजी खांडगे साहेब यांनी सदर कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!