ताज्या घडामोडी

पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदी माऊली दाभाडे यांची बिनविरोध निवड

Spread the love

तळेगाव : पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत माऊली दाभाडे यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे.

भाजपकडून निवडणुकीसाठी माऊली दाभाडे यांच्या विरोधात ज्ञानेश्वर दळवी,शांताराम काजळे व तुकाराम भोईरकर यांचे अर्ज दाखल झाले होते. त्या सर्वांचे अर्ज छाननीमध्ये बाद झाल्याने दाभाडे यांची बिनविरोध निवड झाली.

माऊली दाभाडे हे संत तुकाराम साखर कारखान्याचे संस्थापक संचालक आहेत. त्यांनी कारखान्याचे उपाध्यक्ष पदही भूषविले आहे. त्यांना सहकार क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असून त्यांनी अनेक वर्षे जिल्हा बँकेवर काम केले आहे.त्यांच्या निवडीबद्दल मावळचे  आमदार सुनिल शेळके यांनी व कार्यकर्त्यांनी त्यांच्यी भेट घेवून शुभेच्छा दिल्या.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!