ताज्या घडामोडी

काल्याच्या कीर्तनाने काकड आरती सोहळ्याची सांगता

Spread the love

तळेगाव :तळेगाव स्टेशन परिसरातील विठ्ठल रखुमाई मंदिरात सालाबादप्रमाणे काकड आरती सोहळ्याची सांगता ह.भ. प. माऊली महाराज मोकाशी आळंदीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली.

21 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर असा महिनाभर काकड आरती सोहळा पार पडला.तर 24 नोव्हेंबर रोजी तळेगाव शहरातून दिंडी पादुका रथाची नगर प्रदक्षिणा झाली. विठ्ठल मंदिर देवस्थान चे संस्थापक ब्रह्मचैतन्य ह.भ.प. मुकुंद महाराज तळेगावकर व प्रवर्तक ह. भ. प. भाऊ महाराज औंधकर यांच्या आशीर्वादाने 28 नोव्हेंबर रोजी पायीवारी दिंडी सोहळ्याचे तळेगाव वरून आळंदीकडे प्रस्थान झाले.

यावेळी देवस्थान तळेगाव स्टेशन विठ्ठलवाडीचे अध्यक्ष दत्तात्रय नीळकंठ, खजिनदार अशोक कुडाळकर,सचिव शत्रुघ्न औंधकर, राजू जावळेकर, विश्वस्त ह भ प ज्ञानेश्वर महाराज जावळेकर, ह भ प शांताराम महाराज जवळेकर, चंद्रकांत औंधकर, राम यादव,कार्यकर्ते सोमनाथ जावळेकर, ज्ञानेश्वर औंधकर, धनंजय लाखे,गणेश जावळेकर, विकी कुडाळकर, दीपक निंबाळकर,अमर बोरकर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!